दशपर्णी अर्क हा उत्तम प्रतीचे एक सेंद्रीय कीटकनाशक आहे. याचा उपयोग सेन्द्रिय शेतीमध्ये केला जातो. जो दहा वेगवेगळ्या वनस्पतींच्या पानांपासून बनविला जातो. यामध्ये एक विशेष गोष्ट देखील आहे की पशु जे वनस्पती खात नही अशा झाडाची पाने वापरावी लागतात. यापासून प्रत्येक प्रकारच्या किटवर बंदी घालता येते.पानांन व्यतिरिक्त शेण आणि गोमुत्र देखील वापरले जाते, जे सेंद्रिय आहे. आणि दशपर्णी अर्क 6 महिन्यांपर्यंत वापरला जाऊ शकतो.
आवश्यक साहित्य -
·
कडुलिंबाची पाने -
५ किलो
·
करंजाची पाने -
२ किलो
·
निर्गुडीची पाने -
२ किलो
·
टनटनीची पाने - २ किलो
·
सिताफळाची पाने -
२ किलो
·
रुईची पाने - २ किलो
·
लाल कन्हेराची पाने -
२ किलो
·
पपईची पाने -२ किलो
·
वन एरंडाची पाने -
२ किलो
·
गुळवेलीची पाने -
२ किलो
·
गायीचे शेण - ५ किलो
·
गोमुत्र -
१० लिटर
·
पाणी -
२०० लिटर
वर नमूद केलेली वनस्पतीची सर्व पाने
कापून प्लास्टिक टाकीमध्ये घाला आणि काठीने ढवळावे व चांगले मिसळा. त्यानंतर त्यात
गोमुत्र आणि शेण मिसळा. ही टाकी एका सावलीच्या जागी 28 ते 30 दिवस कपड्याने झाकून
ठेवा आणि सडण्यासाठी ठेवा. हे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळा नीट ढवळून घ्यावे. 28
ते 30 दिवसांनंतर हे अर्क घ्या. हा अर्क सहा महिन्यांसाठी वापरला जाऊ शकतो. हे
मिश्रण फक्त प्लास्टिकच्या टाकीमध्येच ठेवा.
असा तयार केलेला २५० मिलि अर्क हा १५
लिटर पाण्यात मिसळून त्याची पिकांवर फवारणी करतात.
सदर माहिती जिल्हा
अधिक्षक कृषी अधिकारी वाशिम यांच्या युट्यूब चायनल वरून.
https://youtu.be/063sl1ub02k
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा